(आरोग्य )
हृदय (Heart) हा आपल्या सर्वांच्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. आपलं संपूर्ण शरीर हृदयाशी जोडलेलं आहे. आपलं हृदय न थांबता सतत कार्य करत असतं. आजच्या काळात लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. आरोग्यासाठी अपायकारक जीवनशैली हे हृदयाच्या समस्यांचं एक महत्त्वाचं कारण आहे. अनेकदा लोकांना अचानकपणे कार्डियाक अरेस्ट आणि हृदयविकाराच्या झटक्याचा सामना करावा लागतो. सामान्यतः ही समस्या अनियमित जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे निर्माण होते. या सवयीमुळे हृदय कमकुवत होत असते.
मानवी शरीरात हृदयात हा महत्त्वाचे अवयव असल्याने त्याचे रक्षण करणे ही स्वतःची जबाबदारी आहे. मात्र हल्लीच्या या धावपळीच्या जगात चुकीच्या आहार शैलीमुळे हृदयासंबंधी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे हृदय कमकुवत होत आहे. जेव्हा तुमचं हृदय कमकुवत असतं तेव्हा स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. या परिस्थितीत व्यक्तीला अनेक प्रकारचे मोठे आजारही होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबाची समस्या असो किंवा श्वास घेण्यात अडचण येत असो, अशा परिस्थितीत शरीरासाठी निरोगी हृदय असणे खूप गरजेचे आहे.
छातीत दुखणे
हृदय कमकुवत होत असल्याची काही लक्षणे आहेत. त्यातील महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे, काही लोकांना पाच मिनिटे खांदे आणि छाती दुखते. असे होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हे दुखणे सामान्य आहे असे आपल्याला वाटतं असले तरी तसं होत नाही. ही समस्या निर्माण होणे म्हणजेच तुमचे हृदय कमकुवत असू शकते.
उच्च रक्तदाब
हल्लीच्या काळात बहुतांश लोकांना रक्तदाबाची समस्या आहे. यातील काहींना उच्च रक्तदाब तर काहींना कमी रक्तदाबाची समस्या आहे. हा त्रास लोकांना कायम असतो. या परिस्थितेकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. बीपीचा हा त्रास तुमचे हृदय कमकुवत असल्याचे संकेत आहे. अशा परिस्थितीत तात्कळ वैद्यकीय सल्ला घेत हृदयाची तपासणी करावी.
घोरणे आणि झोपेच्या समस्या
निद्रानाश, घोरणे किंवा झोपेशी इतर समस्या हे देखील हृदय कमकुवत असल्याचे संकेत आहे. काही लोकांना घोरणे आणि झोपेशी संबंधित समस्या असतात. ही सामान्य समस्या असल्याचे समजत लोक उपचार घेत नाहीत. मात्र असे करणे घतक ठरू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत हृदयाच्या आरोग्य विषयी सतर्क राहत, वैद्यकीय सल्ला घ्यावा. अन्यथा नंतर हृदया संबंधी मोठा त्रास होऊ शकतो.
हृदय संबंधी समस्या टाळण्यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करा. तसेच नियमित व्यायाम, सकस आहार घ्या, मद्यपान-धूम्रपान टाळा आणि महत्त्वाचे म्हणजे वेळोवेळी हृदयाच्या आरोग्याची तपासणी करा
- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात दुखतं.
- अस्वस्थ वाटतं, मन चलबिचल होतं.
- चक्कर येते.
- प्रचंड घाम येतो.
- श्वास घेण्यात अडचण
- उलटीसारखं वाटतं.
- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घ्यावा लागतो.
- महिला, ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस असणाऱ्यांना छातीत प्रचंड दुखत नाही. मात्र तरीही तो हार्ट अॅटॅक असू शकतो.
का होते हृदय कमकुवत
- तणावपूर्ण आयुष्य
- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा
- उशिरापर्यंत काँप्युटरवर काम
- स्मोकिंग, तंबाखू, दारूचं व्यसन
- हवा प्रदूषण,
- आरोग्यासाठी घातक ‘जंक फ़ूड’ चे सेवन
(टीप : वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. घरात कोणाला अशा काही समस्या, त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या)