(खेड)
राज्यस्तरीय स्काऊट गाईड अंतर्गत जिल्हा परिषद शाळा अस्तान नं. १ शाळेत स्काऊट गाईड अंतर्गत कब व बुलबुल युनिट स्थापन केले असून या प्रशालेतील राणी लक्ष्मीबाई बुलबुल युनिट मधील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनी सन 2021/2022 मध्ये घेण्यात आलेल्या हिरकपंख राज्य पुरस्कार परीक्षेसाठी प्रविष्ठ झाल्या होत्या. ही परीक्षा माध्यमिक शिक्षक पतपेढी, रत्नागिरी येथे दिनांक 28/03/2022 ते 30/3/2022 या कालावधीत घेण्यात आली होती.
सदर परीक्षेमध्ये अस्तान नं .1 शाळेतील कु.गौरी संतोष चव्हाण, कु.साक्षी विजय सावंत, कु. प्राची राजेंद्र मोरे, कु.प्रणिता पांडुरंग आखाडे , कु. अनुष्का संतोष चव्हाण, कु. आर्या अनिल तांबे, कु. ऋतुजा मनोज तांबे, कु.सृष्टी कुंदन जाधव, कु. आसावी दत्ताराम मोरे, कु. संचीता दत्ताराम मोरे, कु.ज्योती जनार्दन आखाडे या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांनींना प्रशिक्षक व अस्तान नं. १ शाळेच्या शिक्षिका श्रीमती अर्चना पालकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांनींचे माजी जि. प. सदस्या दर्शना मोरे, शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर शिर्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनिशा तांबे, शिक्षक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.