(मुंबई / किशोर गावडे)
स्वरू इटरटेन्टेंटमेन्ट प्रस्तुत सूसाट हास्यविनोद आणि स्टार्सच्या परफॉर्मन्सेसनी रंगले धम्माल विनोदी नाटक “तिट्यावर कायतरी भानगड आसा”. उत्सव परिवार गणेश मित्र मंडळ व श्री समर्थ प्रतिष्ठान आयोजित भांडुप कोकण नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य कोकण महोत्सवाचा समारोप रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनोदाच्या तडक्याने सुरुवात झाली. “तिट्यावर कायतरी भानगड आसा” या नाटकाचा प्रथमच शुभारंभ अप्रतिमरित्या सादर करण्यात आला. स्व. अटलबिहारी वाजपेयी मैदानावर नाट्यरसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. लेखक व दिग्दर्शक नाट्य अभिनेता स्वरूप सावंत सहदिगदशक मयुरी निकम, संगीत आणि प्रकाश योजना निनाद विवेक सावंत यांनी नाटकात शेवटच्या क्षणापर्यंत जिवंतपणा आणण्यासाठी छान प्रयत्न केले.
सर्व स्टार्सच्या परफॉर्मन्सेसनी चारचाँद. लावले. हास्य-विनोदाचा जल्लोष असलेल्या या रंगतदार नाटकाचे खुमासदार सूत्रसंचालन स्वरूप सावंत व प्रकाश गोडे यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली. नाटकाचा शेवट होताना दिलखेचक नृत्यविष्काराने सर्वांची मने जिंकली. स्वरुप सावंत यांच्या बहारदार स्किटसने उपस्थितांना मनसोक्त हसवले. धम्माल विनोदी परफॉर्मन्सेस, आकर्षक नृत्याविष्कार आणि दिग्गजांच्या उपस्थितीत नाटकांची सांगता झाली. चित्रकला स्पर्धा, एकेरी व सामायिक नृत्य स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी खासदार संजय पाटील व राजोल संजय पाटील, सुप्रिया धुरत यावेळी उपस्थित होते. संयोजक सुप्रिया सुजय धुरत यांच्यावतीने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. जेष्ठ उद्योजक सतिष अधिकारी व सिद्धिविनायक शिक्षण संस्था, आर के डीएड कॉलेज, व राजारामशेठ विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व संचालक रमेश खानविलकर, माजी मुख्याध्यापक विश्वास धुमाळ यांच्या हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना गौरविण्यात आले. उद्योजक विलास मर्गज, विठ्ठल भाऊ परब, संजीव सावंत, सुभाष सावंत, संजय धुमाळ, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ विश्राम चव्हाण यांनी सदिच्छा भेटी देऊन आयोजक सुजयव सुप्रिया धुरत यांच्या संकल्पनेचे कौतुक केले.