( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबा येथे दर्ग्याजवळील वळणावर सोमवारी 30 जानेवारी रोजी सकाळी पावणे आठच्या दरम्यान साखर घेऊन येणारा ट्रक उलटला. त्यात चालक जागीच ठार झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. फारुख इसाक जमादार (चालक ३८) हे जागीच ठार झाले. तर क्लिनर कमरान कलादगी (वय २४) जखमी आहे. दोघेही बागलकोट, कर्नाटक येथील आहेत.
सविस्तर वृत्त असे की, कर्नाटकातून जयगड बंदराकडे साखरेची पोती घेऊन जाणारा केए २३ ए ६६९४ हा ट्रक हातखंबा येथील उतारावर नियंत्रण सुटल्याने तो बाजूच्या मोकळ्या जागेत पलटी झाला. ट्रक उलटला येथे याच वेळी येथे दोन बैल चरत होते. या ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैल जागीच ठार झाला.
अपघातातील जखमीला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेने तात्काळ रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती
मिळतातच हातखंबा येथील महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पटील व श्री घोसाळे, श्री सावंत, श्री उतेकर, घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. वाहतूक पूर्ववत केली.