(रत्नागिरी / प्रतिनिधी)
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर व श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय हातखंबा येथे सालाबाद प्रमाणे 12 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचे निमित्ताने विविध स्पर्धा, व्याख्याने आयोजित केली जातात.
प्रारंभी श्री. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष रानमाळे व माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ मधाळे एम. एस. यांच्या हस्ते श्री. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीफळ देऊन करण्यात आले. त्यानंतर श्री. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची हातखंबा गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विद्यार्थिनींनी लेझीम व झांज पथकाने मिरवणुकीत शोभा आणली.
यानंतर श्री. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन श्री सुनील दत्त उर्फ आप्पा देसाई यांनी करून विवेकानंद जयंती सप्ताह शुभारंभ करण्यात आला, यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य प्रा. चंद्रमोहन देसाई, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती श्री. परशुराम कदम उपस्थित होते. तसेच इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी श्रावणी करांडे हिने राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल तर इयत्ता बारावीची विद्यार्थिनी दीक्षा कळंबटे हिने श्री स्वामी विवेकानंद यांचे बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. चंद्रमोहन देसाई व श्री. परशुराम कदम यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना श्री. सुनील दत्त देसाई म्हणाले की, विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे एक करिअर म्हणून पहावे. यश, पैसा व प्रसिद्धी क्रीडा क्षेत्रात मिळू शकते यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल केली पाहिजे. यानंतर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री. सुनीलदत्त देसाई, श्री. परशुराम कदम, उपसरपंच श्री. सुनील डांगे यांच्या उपस्थितीत झाले तसेच पाहुण्यांच्या उपस्थितीत इयत्ता दहावी व बारावी मुले यांच्यामध्ये कबड्डीचा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. व्ही. जी.परीट यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सुभाष रानमाळे यांनी केले. तर आभार श्री भिमसिंग गावित यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य निरंजन जठार, माता- पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ. निशा पवार, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.