(मुंबई)
समता परिषदेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचं काल मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात निधन झालं आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्याने हरी नरके यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं राज्यातील अनेक नेत्यांनी यावर शोक व्यक्त करत हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. परंतु आता लेखक लेखक संजय सोनवणी यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांवर धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. हरी नरके यांच्यावर हार्ट ऐवजी अस्थमावर उपचार करण्यात आल्याचा आरोप संजय सोनवणी यांनी केला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हदयाचा आजार असताना हरी नरके यांच्यावर अस्थमाचे उपचार झाले, असे गंभीर आरोप हरी नरकेंचे मित्र संजय सोनवणी यांनी केले आहेत. हरी नरके यांच्या मृत्यूला लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार आहेत. अस्थमाचा त्रास नसतानाही त्यांच्यावर उपचार केले गेले. हरी नरके यांना हदयाचा आजार होता. मात्र त्यांच्यावर अस्थमाचे उपचार करण्यात आले. जामनगरला गेल्यावर त्यांना कळले की उपचार चुकीचे होत आहेत. डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि शासनाने याची चौकशी करावी, अशी मागणी संजय सोनवणी यांनी केली आहे.
हरी नरके यांनी लेखक संजय सोनवणी यांच्याशी बोलतानाही लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवले होते. संजय सोनवणी बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांचा 22 जून 2023 रोजी मला व्हॉट्सॲप संदेश आला होता. त्यात त्यांनी डॉक्टरांच्या बेजबाबदारपणावर शंका घेतली होती.’
हरी नरके आपल्या व्हॉट्सॲप संदेशात नेमके काय म्हणाले होते हे खाली जशास तसे वाचा…
“प्रिय भाऊ, नमस्कार
गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन
पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे.
आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.
ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला.
मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.
जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते.
हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.
लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.
लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला.
regards.
[14:29, 22/06/2023] Hari Narke 2:
हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.
आता बरा होतोय.”
माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?
-संजय सोनवणी
https://www.facebook.com/photo.php?fbid=2615513431929404&set=a.109783569169082&type=3&ref=embed_post