(रत्नागिरी)
हरचिरी पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर हरचिरी उमरे या प्रशालेत एस. एस. सी. मार्च 2022 या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशालेमार्फत जाहीर सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र झापडेकर यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. उज्वल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संतोष पांचाळ, सचिव श्री. अभय दळी, खजिनदार दत्तात्रय उर्फ भाऊ गांगण, संस्था सदस्य श्री. हनिफशेठ धामसकर, सदस्या सौ. दामिनी भिंगार्डे हे संस्था पदाधिकारी उपस्थित होते. प्रथम अध्यक्ष महोदय व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर संस्था पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने चांदेराई ग्रामपंचायतचे माजी सरपंच इस्माईल जी खान व टीके केंद्राचे विद्यमान केंद्रप्रमुख श्री. दीपक माळी सर यांचा अध्यक्ष महोदयांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच संस्थाध्यक्ष श्रीयुत झापडेकर यांनी 100% निकालाबद्दल सर्व शिक्षकांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर इयत्ता दहावी मध्ये उज्वल यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे हितचिंतक, मार्गदर्शक, दातृत्वमूर्ती श्री. बापूसाहेब बेर्डे संस्था सदस्य श्री. हनीफशेठ धामस्कर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक गांगण सर यांच्या माध्यमातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. तसेच जी पी ऍग्रो चे मालक व संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. शशी शेखर उर्फ बाबा दळी यांच्यातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू स्वरूपात पेन वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थिनी कुमारी. जान्हवी खाके हिला संस्था सदस्या सौ. दामिनी भिंगार्डे यांचेकडून रोख 501/- चे बक्षीस देण्यात आले. त्याच प्रमाणे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी प्रणव राडये, काजल सांडिम, अजित जोगळे, श्रद्धा निंबरे, मानस वारीशे यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिक्षक वृंद आणि संस्था चालक यांना धन्यवाद दिले व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षक वृंदांमधून श्री कदम सर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, श्री. माळी सर, श्री. गांगण सर व सौ. दामिनी भिंगार्डे यांनीही आपली मनोगत व्यक्त करून मुलांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणातून श्री. झापडेकर यांनी मुलांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अर्जुन सर यांनी केले व आभार श्री. शेट्ये सर यांनी मानले. अशा रीतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला