( संगमेश्वर )
संगमेश्वर तुरळ येथे चोरीची एक वेगळी घटना घडली आहे. अनेक फायनान्स कंपन्या ग्राहकाने गाडीचे हप्ते थकवले की गाडी जिथे असेल तिथून उचलतात आणि ऑफिसला जमा करतात. असे करण्याचा एक प्रकार एका फायनान्स कंपनीच्या अंगलट आला आहे. गॅस सिलेंडर भरलेली मॅक्स गाडी चोरीला गेल्याची तक्रार तुरळ येथील दत्ताराम धोंडू लिंगायत यांनी संगमेश्वर पोलिसात दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम लिंगायत यांच्या मालकीची मॅक्स गाडी (MH04, EY-1566) या गाडीवर एका फायनान्स कंपनीचे 2,50,000 (अडीच लाख) रुपयांचे कर्ज आहे. या गाडीचे हप्ते थकले होते. लिंगायत यांनी ही गाडी घराजवळ लावून ठेवली होती. या गाडीत गॅसचे रिकामे एकूण 65 सिलेंडर भरलेले होते. तसेच फायर रेस्टिक फिशर (आग विझविण्याचे मशीन) असा सुमारे 2 लाख 36 हजार रुपयांचा माल या गाडीत होता. ही गाडी घराजवळ नसल्याचे लक्षात आल्यावर लिंगायत यांनी घरातील व्यक्तींकडे याची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी लिंगायत यांच्या फिर्यादीनुसार पोलिसानी पवन उदयकुमार मिरकर (30, जाकिमीऱ्या, रत्नागिरी), आणि अमित शंकर खडसोडे (38, झारणी रोड, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कामेरकर, कांबळे, म्हसकर, गोंदल यांनी करत संशयित आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
ही कामगिरी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सचिन कामेरकर, चंद्रकांत कांबळे, अनिल म्हसकर, बाबुराव गोंदल यांनी करत संशयित आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.