(संगमेश्वर / प्रतिनिधी )
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षण घेत असता शहरी विभाग किंवा माध्यमिक विभाग यामध्ये उपलब्ध असलेल्या विज्ञान विषयाच्या प्रयोग शाळे प्रमाणे प्रात्यक्षिक, कृती, प्रयोग साहित्य इत्यादी गोष्टींचा फायदा होत नाही. करीता ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय जनकल्याण समिती व विज्ञान प्रकल्प समिती याद्वारे फिरती विज्ञान प्रयोगशाळा कार्यान्वित आहे. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधीला वाव मिळावा म्हणून फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचा शुभारंभ जिल्हा परिषद केंद्र शाळा अंत्रवली मराठी तालुका संगमेश्वर या शाळेत अंत्रवली गावच्या सरपंचा श्रीमती सारंगी सुर्वे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
या प्रयोगशाळे बद्दल श्रीकृष्ण खातू व विज्ञान प्रशिक्षक दिलीप काजवे यांनी उत्तम प्रकारे महत्व व कार्यवाही याची माहिती देताना सांगितले की , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा स्वयंप्रेरणा, सत्यता, व विश्वास वाढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. व भविष्यात विज्ञानावरील प्रेम वाढीस लागेल. जेणेकरून चालू काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अधिका अधिक जोपासला जाइल व प्रत्येक विद्यार्थी निष्कर्षापर्यंत पोहोचावा हाच महत्त्वाचा हेतू आहे.
यावेळी व्यासपीठावर अंत्रवली गावच्या सरपंच सारंगी सुर्वे,
व्यवस्थापन समिती अध्यक्षा पायल मालप, मालप आजी, मुख्याध्यापक कुंभार गुरूजी सराटे गुरूजी, लाड बाई , आंब्रे , अंगणवाडी सेविका पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक कुंभार गुरुजी यांनी केले,