(नवी दिल्ली)
बाजारपेठेतील स्पर्धा संपवण्यासाठी आपले वर्चस्व वापरल्याचा आरोप Google वर करण्यात येऊन गुगलला १३३८.७६ कोटींचा दंड ठोठवण्यात आला आहे. आपल्या मजबूत स्थितीचा गैरवापर केल्याच्या आरोपात Google ला भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने हा १३३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बाजारपेठेतील स्पर्धा संपवण्यासाठी आपले वर्चस्व वापरल्याचा आरोप गुगलवर करण्यात आला आहे. त्याप्रकरणी गुगलला १३३८.७६ कोटींचा दंड ठोठवण्यात आला आहे. अँड्रॉयड मोबाइल उपकरण क्षेत्रात बाजारात आपल्या मजबूत स्थितीचा दुरुपयोग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सीसीआयने प्रमुख इंटरनेट कंपनीला आपल्या चुका सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबत सीसीआयने म्हटले आहे की, गुगलने बाजारपेठेमध्ये स्पर्धा संपवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आहे. गुगल भारतने संगीत, ब्राउझर,अॅप लायब्ररी आणि अन्य सेवांत वर्चस्व राखण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच, अॅप निर्माता कंपन्यांवर एकतर्फी करार लादले आहे.
CCIने म्हटले की, मोबाइल एप्लिकेशन डिस्ट्रीब्यूशन अग्रीमेंट (MADA)नुसार संपूर्ण Google मोबाइल सूट (GMS)चे अनिवार्य प्री-इंस्टॉलेशन प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन करते. आयोगाने म्हटले की, Google आपल्या मोबाइल सूटला अनइंस्टॉल करण्याचा कोणताही पर्याय नाही. यामध्ये म्हटले आहे की, गुगलने अधिनियम कलम ४ (२) (डी) चे उल्लंघन केले आहे.