मंचूरियन हे नाव एकले तरी तोंडाला अगदी पाणी सुटते. लहान मूल असो अथवा वयस्कर आजोबा आजी असो, कुणालाही मंचूरियन असे नाव काढताच, मंचूरियन खाण्याची ईच्छा होते. मंचूरियन हा असा चटपटीत इंडो- चायनीज पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो. खालील साहित्य व कृती वापरुन तुम्ही अगदी रुचकर, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे मंचूरियन घरच्या घरी बनवू शकता. बर्याच लोकांना विकत घेऊनच खाद्य पदार्थ खाण्याची सवय असते. पण घरी योग्य पद्धतीने रेसिपी वाचून केल्यास ते पदार्थ अत्याधिक चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर असे होतात.
मंचूरियन व्हेज आणि नॉन-व्हेज या दोन प्रकारात बनवले जातात. वेज मंचूरियन मध्ये देखील अजून दोन प्रकार पडतात ते म्हणजे गोबी मंचूरियन आणि दुसरे म्हणजे मिक्स वेज मंचूरियन. गोबी मंचूरियन बनवण्यासाठी भाज्यात फक्त गोबीचाच वापर केला जातो आणि मिक्स वेज मंचूरियन बनवण्यासाठी गोबी सोबत इतर भाज्यांचा देखील त्यात समावेश केला जातो.
मंचूरियन रेसिपी
मंचूरियन रेसिपी ही, वेज गोबी मंचूरियन, मिक्स मंचूरियन आणि नॉन व्हेज मंचूरियन या तिन्ही प्रकारच्या मंचूरियन ची कृती जवळपास सारखीच आहे फक्त साहित्य थोड्या बहुत प्रमाणात बदलते. तर आता सर्व प्रथम आपण पाहूया वेज गोबी आणि मिक्स वेज मंचूरियन चे साहित्य आणि कृती
वेज गोबी मंचूरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य
गोबी मंचूरियन बनवण्यासाठी मुख्यतः पाण गोबी ही लागते तर गोबी मंचूरियन साठी लागणारे साहित्य हे खालीलप्रमाणे आहे. हे साहित्य वापरुन तुम्ही अतिशय स्वादिष्ट आणि कुरकुरीत असे मंचूरियन घरच्या घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया साहित्य
बारीक चिरलेली पाण-गोबी – 2 वाटी
मैदा – मोठे 2 चमचे
कॉर्न फ्लॉवर -1 चमचा
हिरव्या मिरच्या- 3 मोठ्या
लसूण – 7/8 पाकळया बारीक चिरून
मीठ – आपल्या चवीनुसार
मिरेपूड – छोटा अर्धा चमचा
टोमॅटो सॉस – 3 चमचे
पाणी- दोन ग्लास
तेल- तळनासाठी तेल
वरील सर्व साहित्य वापरुन तुम्ही अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मंचूरियन बनवू शकतात ते देखील घरच्या घरी तर त्यासाठी आता पहावी लागणार आहे मंचूरियन बनवण्याची कृती-
मंचूरियन बनवण्याची कृती
आता वरील सर्व साहित्य वापरुन मंचूरियन कसे बनवायचे याची कृती पाहूया,
सर्वात प्रथम आपण दोन वाटी पाण गोबी छान अगदी बारीक कापून घ्यावी. आता एक चमचा कॉर्न फ्लॉवर, या पाण-गोबी मध्ये मिक्स करावे, चवीपुरते मीठ टाकावे मीठ, ओबड-धोबड बारीक केलेला लसूण यात टाकावा. लसूण, हिरव्या मिरच्या छोटे 1/2 चमचे आणि अर्धा छोटा चमचा मिरे पूड, हे सर्व साहित्य घ्यावे आणि एका खोल परात अथवा ताट मध्ये एकत्र करावे.यात थोडा खाण्याचा सोडा देखील टाकावा आणि थोडे थोडे पाणी टाकत हे मिश्रण छान मळून घ्यावे.
मिश्रणामध्ये असणार्या मीठ व गोबी यामुळे मिश्रणाला पाणी सुटते. त्यामुळे मंचुरियन करत असताना एकत्र केलेल्या सामग्री मध्ये पाणी एकदम टाकू नये. हळू हळू लागेन तसे पाणी टाकून मिश्रण घट्ट मळावे नाहीतर हा गोळा पातळ होईल आणि त्यांचे मंचूरियन जमणार नाहीत व मऊ पडतील. हे सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे पाणी टाकून त्याचा थोडा घट्ट असा गोळा तयार करावा. हा पूर्ण गोळा तयार झाल्यानंतर त्याचे बारीक बारीक लिंबा एवढे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यावे आणि नंतर संपूर्ण करून घ्यावे. त्यानंतर एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हे मंचूरियन चे दोन-तीन गोळे टाकावे आणि सुरूवातीला मोठ्या आचेवर आणि नंतर मंद आचेवर सोनेरी लाल रंगाचे होई पर्यंत तळावे.
मंचूरियन तळत असताना ते नंतर मंद आचेवर तळावे कारण ते मधून कच्चे राहू नये. त्यामुळे सुरूवातीला तळलेला मंचूरियन फोडून मधून कच्चा नाही याची पाहणी करावी. अशा प्रकारे संपूर्ण मंचूरियन तळून घ्यावे आणि थंड करण्यास हवेशीर मोठ्या ताट मध्ये ठेवावे.अशाच प्रकारे मिक्स वेज मंचूरियन बनवावे. फक्त सामग्री मध्ये गाजर, ढोबळी मिरची, दोन हिरवी मिरची आणि पाण-गोबी यांचा वापर करावा आणि बाकी साहित्य आणि कृती सेम करावी. जर आपल्याला नॉन्वेज मंचूरियन बनवायचे असतील तर त्यात नॉन्वेज मिक्स करावे. अशा प्रकारे आपण वरील कृती आणि साहित्य वापरुन वेज मंचूरियन आणि मिक्स वेज, नॉन्वेज मंचूरियन बनवू शकतो. आता आपण पाहूया मंचूरियन ग्रेवी रेसिपी काय आहे?
मंचूरियन ग्रेवी रेसिपी
आपण आवडत असेल तर ड्राय मंचूरियन देखील खाऊ शकतो आणि जर आपल्याला मंचूरियन विथ ग्रेवी पाहिजे असतील तर खालील साहित्य आणि कृती वापरुन मंचूरियन ग्रेवी बनवावी.
ग्रेवी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तेल – 2 चमचे
सोया सॉस – 2 चमचे
टोमॅटो सॉस – 3 /4 चमचे
आल /अद्रक – 1 चमचा खिसलेल
फोडणीसाठी हिरव्या मिरच्या – 2
कापलेला लसूण- दोन चमचे
साखर -चिमूटभर
कॉर्न फ्लॉवर – 2/3 चमचे
पाणी – अर्धी वाटी
वरील सर्व साहित्य वापरुन आपण व्हेज मंचुरियनची ग्रेव्ही बनवू शकतो. आता ही ग्रेवी बनवण्याची कृती खालीलप्रमाणे
ग्रेव्ही बनवण्याची कृती
एका कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे, त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकावा, लसूण लालसर झाला की मग चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस वर सांगितल्या प्रमाणे योग्य प्रमाणात टाकावा आणि चवीनुसार मीठ टाकून मिश्रण मंद आचेवर आणि मोठ्या आचेवर शिजू द्यावे. सोया सॉस हा चवीस आंबट असल्याने जास्त टाकू नये. आता त्यामध्ये, थोडी साखर टाकावी आणि या गरम मिश्रणामध्ये अर्धा चमचा कॉर्न फ्लॉवर टाकावे. कॉर्न फ्लॉवर टाकल्याने ग्रेवी ल थीकनेस येतो. मंद आचेवर याला उकळी आली की, गॅस बंद करावा आणि यात मंचुरियनचे गोळे टाकावे. मंचूरियन टाकल्यानंतर जवळपास 2 मिनटे तरी पॅनवर झाकण झाकून ठेवावे शिजू द्यावे. त्यामुळे ग्रेवी मंचूरियन मध्ये पर्यंत जाते आणि मंचूरियन देखील मऊ होतात.
एका डिश मध्ये तयार चविष्ट मंचुरियन बॉल्स आणि त्यावर गरम ग्रेव्ही देखील टाकू शकता. गोबी मंचूरियन वर बारीक लांब कापलेली पान-गोबी टाकावी आणि हे गरम मंचुरियन सर्व्ह करावे.