एका सोने व्यावसाईकच्या घरातून तब्बल दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी घरातील नोकरासह तब्बल ९ जणांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून २२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चंदू बालाजी मेंढेवाढ (वय ३४, रा. पांडुरणा, ता. भोकर, जि. नांदेड), सारिका अप्पासाहेब सावंत (रा. काळेपडळ, हडपसर), भावना रवींद्र कोद्रे (रा. मुंढवा), जनार्दन नारा?ण कांबळे (रा. शाहूनगर, सांगली), ऋषीकेश राजाराम तोरवे (रा. जत, सांगली), दुर्गाचरण रवींद्र कोद्रे (रा. मुंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात आरोपींनी सराफ व्यावसायिक प्रवीण पोपट दबडे, प्रीतम पोपट दबडे, साथीदार महेश महादेव भोसले (रा. ढालगाव, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) यांना दागिन्यांची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याबाबत स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर भागात राहणाऱ्या सराफ व्यावसायिकाने फिर्याद दिली होती.