(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे बलभिमवाडी येथील युवकांनी सैतवडे परिसरातील शाळा व ग्रामपंचायतींना भारताच्या संविधान ग्रंथाचे वितरण नुकतेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करून एक अभिनव उपक्रम राबविला. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा नं.१,२,३,सत्कोंडी, पन्हळी, केंद्र शाळा जांभारी,दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे, न्यू इंग्लिश स्कुल सैतवडे, इरा इंग्लिश मिडियम स्कुल सैतवडे, खंडाळा हायस्कूल, ग्रामपंचायत सैतवडे, गुम्बद,व सत्कोंडी आदी ठिकाणी संविधान प्रत मोफत वाटप करण्यात आली.
या कामी सुहासन पवार, अनिकेत पवार, तुषार पवार, सागर पवार, लवेश यादव,राजेश पवार, अमित गं.पवार, अमित द.जाधव,अभिजित पवार, आदित्य पवार, निकेश पवार, मोहन पवार, मनिष कदम, अभय सावंत, सुनील स.पवार आदींनी पुढाकार घेतला. या तरुणांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व परिसरात कौतुक केले जात आहे.