(मुंबई)
मुंबई दूरदर्शनचा शुभारंभ दि. 2 ऑक्टोबर, 1972 रोजी झाला. त्या ऐतिहासिक घटनेला रविवार, दि. 2 ऑक्टोबर, 2022 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवार, दि. 1 ऑक्टोबर, 2022 रोजी सायं. 5.00 वाजता `सुवर्णमहोत्सवी मुंबई दूरदर्शन – मंतरलेले दिवस’ हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे असतील. विशेष निमंत्रित म्हणून पुढील मान्यवर सहभागी होणार आहेतण:
डॉ. विश्वास मेहेंदळे, डॉ. याकूब सईद, डॉ. गोविंद गुंठे, आर. एस. सावदेकर, अशोक डुंबरे, डॉ. मुकेश शर्मा, कमल वानखेडे, चंद्रकांत बर्वेे, यशपाल रामावत, विजया जोगळेकर-धुमाळे, बी. के. गिरी, मधु राजा, सुधा चोप्रा, सरिता सेठी, आल्हाद धर्माधिकारी, शशिकांत भोसले, नीना राऊत, शिवाजी फुलसुंदर, अवधूत परळकर, नंदू वाडदेकर, वासंती वर्तक, अजित नाईक, शरद मोघे, दिवाकर सभारंजक, चंद्रकांत तावडे, गोरखनाथ कडू, सुरेश राणे आणि नितीन केळकर. त्याशिवाय मुंबई दूरदर्शनच्या गेल्या 50 वर्षांच्या वाटचालीतील अनेक शिलेदार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांच्या सहभागाने `आठवणीतलं दूरदर्शन’ या सत्रात सुप्रसिद्ध निवेदक श्री. सुधीर गाडगीळ मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. तसेच दि. 2 ऑक्टोबर, 1972 रोजी ज्यांनी मराठी बातम्यांचे पहिले बुलेटीन मुंबई दूरदर्शनवर वाचून दाखविले, त्या डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या `स्मृतींची चाळता पाने’ आणि `या गावाहून त्या गावाला’ या पुस्तकांचे प्रकाशन संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाची संकल्पना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांची आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.