(पुणे)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. त्यानंतर बंडानंतर यंदाची पहिली दिवाळी आहे. ज्यामध्ये सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून आले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या दिवाळीपासून अजित पवार आणि शरद पवार मतभेद विसरून एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावेळी त्यांनी स्नेहभोजनाचीही आनंद घेतला. यानंतर अजित पवार यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊबीज साजरी केली. राजकीय मतभेद विसरुन अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांनी भाऊबीज साजरी केली. या संदर्भातला व्हिडिओही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअऱ केला आहे.
दरम्यान, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत अजित पवार गैरहजर राहिल्यानंतर काटेवाडीत भाऊबीज साजरी करण्यासाठी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. सुप्रिया सुळे काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थनी दाखल झाल्या होत भाऊ अजित पवारांसोबत भाऊबीज साजरी केली. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असे यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले होते. संबंधित व्हिडीओत सुप्रिया सुळे आपल्या इतर बहिणींसमवेत अजित पवारांना एकत्रित ओवाळताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना ओवाळल्यानंतर त्यांच्या पायाही पडल्या आहेत.
भाऊबीज सणानिमित्त आज अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी सुप्रिया सुळेंसह सर्व बहिणी जमल्या होत्या. यावेळी सर्व बहिणींनी मिळून अजित पवारांना ओवाळलं. यावेळी सर्वजण आनंदात दिसत होते. अजित पवारांसह त्यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनाही बहिणींनी ओवाळलं. या संबंधित व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल माध्यमावर शेअर केला आहे. बहिण-भावाच्या या अनोख्या नात्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळे म्हणतात… “भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज… या सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” असं कॅप्शनही सुप्रिया सुळे यांनी लिहिलं
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज…या सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🙏🏼 pic.twitter.com/4yJkbLf1Dv
— Supriya Sule (@supriya_sule) November 15, 2023