(निवोशी-गुहागर/उदय दणदणे)
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र ह.भ.प.श्री.संतोष रामचंद्र दळवी यांची कन्या कुमारी सुप्रिया संतोष दळवी हिने मुंबईत राहून अभ्यासावर प्रचंड मेहनत घेऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी एम.बी. ए (MBA) पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाली.
सुप्रिया दळवीने आपल्या नावाबरोबर, आपल्या आई वडिलांचे, गावाचे, समाजाचे नाव रोशन केले आहे. सुप्रिया शालेय शिक्षण घेत असताना पासूनच खूप हुशार आणि जिद्दी होती. मुंबई सारख्या शहरात आपल्या मुलांना शिक्षण देणे सर्वसामान्य माणसांना परवडत नसतांना सुध्दा सुप्रियाच्या वडीलांनी खूप मेहनत करून सुप्रियाला एम.बी.ए. (MBA) चे शिक्षण दिले. सुप्रियानेही यासाठी खूप मेहनत घेतली, तिच्या मेहनतीला यश आले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन सह शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.