(रत्नागिरी)
कोकण रेल्वे मार्गावर प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशाचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवार ६ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी प्रवाशाने दिलेल्या तक्रारीनुसार, ते अमृतसर विकली सुपर फास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. बुधवारी रात्री ते प्रवासादरम्यान झोपी गेले असता त्या संधीचा फायदा अज्ञाताने त्यांचा सिटवर ठेवलेला मोबाईल लांबवला. गुरुवारी सकाळी ५ वा. सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे आली असता त्यांना जाग आली असता आपला मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.