(क्रीडा)
सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. सुनील छेत्रीच्या हॅट्ट्रिकमुळे भारताने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव ( केला. सुनील छेत्रीने 10व्या, 16व्या आणि 72व्या मिनिटाला गोल केले. 80 व्या मिनिटाला उदांता कुमामने गोल केला. सुनील छेत्रीने पूर्वार्धात दोन गोल केल्यानंतर भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांचे पाकिस्तानी खेळाडूंशी भांडण झाले. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. दुसऱ्या हाफमध्ये सुनील छेत्रीने पेनल्टीवर गोल केला आणि त्यानंतर 80व्या मिनिटाला उदांताने गोल करत संघाची आघाडी 4-0 अशी नेली.
बुधवारी बेंगळुरू येथे झालेल्या सैफ कप 2023 मधील चकमकीत हाफ टाईमची शिट्टी वाजण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलच्या बळावर भारताने अवघ्या 16 मिनिटांत 2-0 अशी आघाडी घेतल्याने दोन्ही संघांमध्ये परिस्थिती थोडी बिघडली. पाकिस्तानी खेळाडू बाॅल आत फेकत असताना भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी चेंडू उचलला तेव्हा हाणामारी सुरू झाली. स्टिमॅकला एका गुन्ह्यासाठी लाल कार्ड देण्यात आले तर पाकिस्तानच्या प्रशिक्षकाला मैदानावरील भांडणासाठी पिवळे कार्ड देण्यात आले.
Fight Between India and Pakistan in football match 🔥🔥🔥🔥
Kuch bhi bolo, apna Igor Stimac hai dabang🤣🤣🤣#IndianFootball #PakistanFootball #INDvsPAK #SAFFChampionship pic.twitter.com/mRZ655iLVc— ^•^ (@grab_this_l) June 21, 2023