(मुंबई)
सीबीएसईकडून दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपासून हा परीक्षा सुरू होणार आहेत. CBSE १०वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर १२वी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत होणार आहे.
इयत्ता 10वी, 12वी परीक्षा जाहीर करताना CBSE ने सांगितले की, साधारणपणे दोन्ही वर्गांमध्ये परीक्षेतील दोन प्रमुख विषयांमध्ये पुरेसे अंतर ठेवलेले आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या तारखा अशा प्रकारे निश्चित केल्या आहेत की, विद्यार्थ्यांच्या दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी नसतील. 12वीची वेळापत्रक तयार करताना, JEE मेन (JEE Main 2023), NEET (NEET 2023) आणि CUET UG (CUET UG 2023) यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखांशी एकत्र येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.
CBSE ने NTA वर्ष २०२३ मध्ये होणार्या प्रमुख प्रवेश परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर आधीच प्रसिद्ध केले आहे. जेईई मेन २०२३ दोनदा घेण्यात येईल. सत्र १ जानेवारी १२, २५, २७, २८, २९, ३० आणि ३१ (राखीव तारखा: फेब्रुवारी १, २, ३) आणि सत्र २ एप्रिल ६,८, १०, ११, १२ (राखीव तारखा: एप्रिल १३ आणि १५) JEE मुख्य सत्र २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. सीबीएसईच्या परीक्षा एक दिवस आधी ५ एप्रिलला संपणार असल्या तरी, १२वीच्या विज्ञान शाखेच्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा २३ मार्चला संगणक विज्ञानाच्या पेपरसह संपतील. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना तयारीसाठी भरपूर वेळ मिळेल.
NEET 2023 चे आयोजन MBBS आणि BDS सह वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुमारे एक महिन्यानंतर ७ मे रोजी केले जाईल. विद्यापीठ प्रवेश परीक्षा CUET २१ मे ते ३१ मे दरम्यान होणार आहे. सर्व परीक्षांचे वेळापत्रक अगोदर जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना नियोजन करणे सोपे जाणार आहे.