(सिंधुदुर्ग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील वराड गावचे सुपुत्र लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे कोकणचा सुपुत्र परदेश पंतप्रधान होण्याचा अभिमान कोकणवासियांना वाटत आहे.
लिओ वराडकर यांचे वडील अशोक वराडकर हे पेशाने डॉक्टर आहेत. तर आई आयरिश या नर्स होत्या. लिओ वराडकर हेही डॉक्टर आहेत.
लिओ वराडकर हे 2017 ते 2020 या कालावधीत आयर्लंडचे संरक्षण मंत्री होते. त्यानंतर त्यांची 2019 मध्ये पंतप्रधानपदी निवड झाली. ते सध्या 43 वर्षाचे आहेत.