(मुंबई)
आज अजित पवारांचा वांद्रे इथे एमईटीत भव्य मेळावा झाला यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर ‘आता तुमचे वय ८२ झाले तुम्ही थांबणार आहे का नाही. असा हल्लाबोल केला’. एखादा माणूस सरकारी नोकरीत लागला तर ५८ व्या वर्षी निवृत्त होतो. आयएस, आयपीएस असेल तर साठाव्या वर्षी निवृत्त होतो. राजकीय जीवनात असाल तर ७५ व्या वर्षी निवृत्त केले जाते.
मुंबईत आज शरद पवार व अजित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी अजित पवार गटाने आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले की, मी खोटे बोलत नाही आणि खोटे बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. जर आम्हाला भाजपसोबत जायचं नव्हतं तर २०१४ मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. २०१७ मध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व आम्ही सगळे बंगल्यावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. त्या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आदि होते. त्यावेळी कुठली खाती, पालकमंत्री पदे ठरली. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून निरोप आला २५ वर्षाचा आमचा मित्रपक्ष त्याला आम्ही सोडणार नाही, असं भाजपनं सांगितलं. शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा असे सरकार राहील असं भाजपाच्या वरिष्ठांनी सांगितले. भाजपने २०१४ ला सांगितलं होतं की, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने १६-१६-१६ जागा लढवाव्या, अशी नितीन गडकरींची इच्छा होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यानंतर भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव बारगळला असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले मी अनेकदा माघार घेतली. लोकांमध्ये मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले. सर्वांकडून टीका सहन केली, पण आता मी सहन करणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार म्हणाले मी अनेकदा माघार घेतली. लोकांमध्ये मला अनेकदा व्हिलन बनवण्यात आले. सर्वांकडून टीका सहन केली, पण आता मी सहन करणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. २०१७ नंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की बाहेर काहीच बोलायचं नाही, असे अजित पवार म्हणाले.