(रत्नागिरी)
शहरातील साळवी स्टॉप येथे मोटार- रिक्षा व दुचाकी असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक व दुचाकीस्वार जखमी झाले. रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे. शहर पोलिस ठाण्यात मोटार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रिक्षाचालक रियाज अहमद शेगळे (रा. टी. जी. शेट्येनगर, रत्नागिरी ) व दत्ताराम सदानंद सुर्वे (५८, रा. भाटये जोयनाकवाडी रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ३१) रात्री साळवी स्टॉप येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ताराम सुर्वे हे गुरुवारी रात्री कामावरून दुचाकीने भाटये येथे घरी जात होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास ते साळवी स्टॉप येथे आले असता त्यांच्यासमोर असलेली रिक्षा हिला मोटारीने समोरून धडक दिली. या अपघातात रिक्षा मागे येऊन दुचाकीवर धडकली. या अपघातात दुचाकीवरील दत्ताराम सुर्वे हे रस्त्यावर पडून जखमी झाले. रिक्षाचालक रियाज शेगळे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी दुचाकीस्वार दत्ताराम सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी मोटार चालक श्वेतांग प्रदीप वायंगणकर (रा. खेडशी- गयाळवाडी, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत