(करिअर)
सारस्वत बँकेअंतर्गत मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी पदभरती निघाली असून त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. येत्या आठ एप्रिलपर्यंत उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळं तुम्ही पात्र असाल तर लगेचच नोकरीसाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २७ मार्च २०२३ असून या भरतीसाठी पात्रता व अटी काय आहेत जाणून घ्या.
एकूण पद भरती :
१५०
पदाचे नाव :
कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. बँक/NBFC/विमा कंपन्या/बँकेच्या कोणत्याही उपकंपनीमध्ये काम केल्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
वयाची अट :
इच्छुक उमेदवाराचे वय हे 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी :
750/-
पगार :
2,44,343 – Rs. 4,83,520 वार्षिक.
कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. शिक्षणाची इतर कोणतीही अटक त्यात घालण्यात आलेली नाही. उमेदवाराचं वय २८ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. त्यामुळं पात्र असलेल्या उमेदवारांनी बँकेच्या http://www.saraswatbank.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू भरणं आवश्यक आहे.
असा करा अर्ज :
वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला ‘कनिष्ठ अधिकारी रिक्त पदांची जाहिरातवर येथे क्लिक करा, त्यानंतर सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भर्ती 2023 च्या अधिसूचनेची PDF तुमच्या समोर उघडेल. त्यामध्ये तुम्ही अर्ज करून ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट काढू शकता.
सारस्वत बँकेची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तेथील करियर या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर भरतीसाठीचं पेज ओपन होईल. त्यानंतर व्यवस्थित माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. प्रोफाईल तयार झाल्यानंतर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. त्यानंतर संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्या. त्यानंतर बँकेची वेबसाईट वेळोवेळी चेक करत रहा, जेणेकरून या भरतीसंदर्भातील पुढील अपडेट्स नेहमी मिळतील.