भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोट विषयी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की, शोएबने सानियाला धोका दिला असून सध्या दोघेही वेगवेगळे राहात आहेत. त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत.
हैदराबादमध्ये 12 एप्रिल 2010 रोजी सानिया व शोएब यांचा विवाह झाला होता. या दोघांना इजहान नावाचा मुलगा आहे. दरम्यान, सानियाच्या सोशल मीडियावरील पोस्टने आणखी वाव करून दिला आहे. सानियाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘टूटे दिल कहां जाते है…’ असे लिहिले होते. सानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये स्वत:लाच प्रश्न विचारला आणि स्वत:च त्याचे उत्तर दिले आहे.
दरम्यान, या दोहोंमध्ये दरी निर्माण झाल्याची शंका व्यक्त केली जात असतानाच सानियाने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सानियाचे मन दुखावले गेले असून ती दु:खी झाली आहे. हे दु:ख ती जाहीरही करत आहे. यामुळे या दोहोंमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता पाकिस्तानी मीडियाने व्यक्त केली आहे.