(देवरुख / वार्ताहर)
साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ. मेधा अमोल खाडे यांना औषध निर्माणशास्त्रामध्ये जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, जयपुर, राजस्थान मधून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. सौ. मेधा यांनी “कोकणात आढळणाऱ्या काही निवडक औषधी वनस्पतींचे एक्सट्रॅक्शन आणि त्यापासून अलसरसाठी बनवलेल्या औषधांचे मूल्यमापन” या विषयावर संशोधन करून शोधनिबंध सादर केला. सदर संशोधन आणि त्यातील महत्त्वाचे निष्कर्ष त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. या संशोधनास त्यांना जयपुर नॅशनल विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मनीष कुमार गुप्ता आणि डॉ. सुप्रिया ह्याम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सौ. मेधा खाडे या गेली १५ वर्षापासून प्रबोधन शिक्षण संचालित, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली मध्ये कार्यरत असून, परीक्षा विभाग प्रमुखाची जवाबदारी देखील यशस्वी पणे सांभाळत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अमोल खाडे, यांनी अभिनंदन केले आहे. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने आणि सर्व संस्था पदाधिकारी यांनी देखील त्यांच्या या यशाबद्दल कौतुक आणि अभिनंदन केले आहे.