(मुंबई)
साई रिसॉर्ट प्रकरणी कोठडीत असलेल्या सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी विशेष पीएमएलए कोर्टात ८ जूनला होणार असून या सुनावणीत प्रकरणाचा युक्तीवाद पूर्ण होणार आहे.
साई रिसॉर्टचे बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप ईडीने केला आहे. यात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामध्ये सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांचा सहभाग असल्याचे आरोपपत्र ईडीने दाखल केले.
त्यानंतर दोघांनी जामिनासाठीचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने २ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली होती. मात्र शुक्रवारी न्यायालयाने ही सुनावणी ८ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे सदानंद कदम आणि जयराम देशपांडेंना आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.