(रत्नागिरी)
साईशक्ती क्रीडा मंडळ मिरजोळेच्यावतीने श्री साई भंडारा पालखी महोत्सव २०२३ निमित्त रत्नागिरी तालुक्यातील साईशक्ती प्रिमिअर लिग २०२३ (वर्ष २रे) भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा दि. २६ मार्च २०२३ ते २८ मार्च २०२३ या कालावधील आयोजित केली जाणार आहे. यामध्ये विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान केले जाणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू, सर्वोेत्कृष्ट चढाईपटू व सर्वोकृष्ट पकड यासाठी विविध बक्षिसे देऊन खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी एका खेळाडूची निवड उत्कृष्ट खेळाडू म्हणून करण्यात येणार असून त्याला आकर्षक बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या संघांची मंडळाच्यावतीने भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये १० खेळाडूंचे ८ संघ तसेच ८ प्रशिक्षक निवडण्यात येणार आहेत. ही निवड मंडळाची निवड समिती करणार आहे.
साईशक्ती प्रिमिअर लिग २०२३ प्रो कबड्डी स्पर्धा या स्पर्धेेमध्ये संघमालक म्हणून सहभाी होण्यास इच्छुक असणार्या क्रीडा रसिकांनी तसेच या स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून सहभाग घेवू इच्छिणार्या खेळाडूंनी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी व अधिक माहितीसाठी संतोष मयेकर-८३२९४८७१९४, संकेत भाटकर – ९४०३१७१६६३, साईप्रसाद कीर – ९८३४३८९८९२, साईराज मयेकर – ८९९९५८५२१८ यांच्याशी संपर्क साधावा.
तरी या सुवर्णसंधीचा लाभ खेळाडुंनी व क्रीडा रसिकांनी घेण्याचे आवाहन साईशक्ती क्रीडा मंडळ, मिरजोळेच्यावतीने अध्यक्ष संभाजी मयेकर यांनी केले आहेे.