(संगमेश्वर/ प्रतिनिधी )
कोकणातील चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकार, हस्तकारागीर, कलासंग्राहक, कलारसिक यांची उपस्थिती त्याचबरोबर संगमेश्वर चिपळूण मतदार संघांचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी देखील आपला अमूल्य वेळ देऊन या सर्वांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक धोरण ठरवण्यासंदर्भात शासनाने एक समिती स्थापन केली असून त्यातील दृश्यकला विषयाचे प्रमुख सुहास बहुलकर आहेत.त्यांच्यासोबत या समितीत प्राध्यापक जी.एस माजगावकर (कोल्हापूर )डॉ.श्रीकांत प्रधान (पुणे) प्राध्यापक. चंद्रकांत चन्ने (नागपूर ),उपयोजित कला विषयाचे तज्ञ चित्रकार सुनील महाडिक (मुंबई) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक गणेश तरतरे हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही समिती महाराष्ट्रात विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील शासकीय संग्रहालय अभ्यासणार आहेत. त्यासोबतचित्रकार, शिल्पकार, उपयोजित चित्रकार, हस्त कारागीर, कलासंग्रहाक,कलाशिक्षक, कलारसिक यांच्याशी चर्चा करून या चर्चेत महाराष्ट्रात एकूणच दृश्यकला विषयक आपल्याला काय अपेक्षा आहेत याबाबत चर्चा झाली. सर्व कलाअभ्यासकांनी आपापली मते मांडली, आपले अनुभव सांगितले.
प्रा. गणेश तरतरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की,कलावंताला संकल्पना सुचल्या पाहिजेत आणि या संकल्पना अशा चर्चासत्रानेच सुचतील. आणि कलावंताचा कॉन्सेप्ट स्पष्ट होईल. या सर्व चर्चेतून शासनाला काय करता येईल याबाबत ठोस सूचना कराव्यात असा या कोकण दौऱ्याचा हेतू होता, तो साध्य झाला.
कोकणातील या सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने कोकणातील अग्रगण्य चित्र शिल्प कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट,सावर्डे येथे दि.२४ जून २०२३ रोजी सकाळी १०वा. ते ४ या दरम्यान हे चर्चासत्र संपन्न झाले . तसेच सभेसाठी येतांना कलातज्ञांनी आणलेल्या अपेक्षा व सूचना लेखी स्वरूपात समितीकडे देण्यात आल्या.