(नवी दिल्ली)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, शुक्रवारी नवी दिल्लीत सीआयआयच्या कार्यक्रमात उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले की, येत्या सहा महिन्यांत विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्याची टोल प्रणाली बदलून जीपीएस आधारित नवीन टोल प्रणाली देशात लागू केली जाईल.
या उपक्रमामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून वाहनचालकांना अंतरानुसार पैसे भरण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या अंतर्गत स्वयंचलित कॅमे-यांद्वारे स्वयंचलित नंबर प्लेट ओळखण्याची प्रणाली, कार्यान्वित केली जात आहे, ज्यामुळे वाहने न थांबवता टोल आपोआप कापला जाईल.
फास्टैग लागू होण्यापूर्वी, २०१८ -१९ या आर्थिक वर्षात टोल प्लाजावर सरासरी आठ मिनिटांची प्रतीक्षा वेळ होती, परंतु ही वेळ २०२० -२१ आणि २०२१-२२ मध्ये 47 सेकंदांवर आली आहे.