(वाराणसी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जानेवारी रोजी सकाळी वाराणसी येथे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ-एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच या कार्यक्रमादरम्यान ते १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर अनेक देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील होणार आहे.
गंगा विलास क्रुझमध्ये फाईव्हस्टार हॉटेल्सच्या सर्व सुविधा आहेत. १८ स्पेशल सुविधांससह विशेष खोल्या आहेत. तसेच प्रवाशी आणि क्रु मेंबर्ससह ७१ जणांसाठीची खास सोय आहे. ही गंगा विलास क्रुझ आता ५१ च्या ऐतिहासिक प्रवासासाठी सज्ज झाली आहे. वाराणसीच्या काठावरुन ही क्रुझ उद्या १३ तारखेला निघेल. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिला हिरवा झेंडा दाखवती. पहिल्या फेरीसाठी 31 विदेशी प्रवासी यातून प्रवास करतील..
असा असेल क्रुझ चा प्रवास
१३ जानेवारी रोजी ही क्रुझ वाराणसीतून निघेल. पुढे बिहारच्या पाटण्यातून पश्चिम बंगालच्या दिशेने जाईल. त्यानंतर बंगालच्या उपसागरातून बांगलादेशात पोहोचेल. पुढे लहान मोट्या नद्यांमधून गंगा विलास क्रुझ आसाममध्ये पोहोचेल. भारत आणि बांगलादेशामधील ५ राज्यातून ही क्रुझ जाणार असून गंगा, यमुनेसह २७ नद्यांमधून ३ हजार २०० किलोमीटर अंतर पार करेल. या बाबतची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. दरम्यान, यामुळे जलवाहतूक आणि पर्यटनाला नवी गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यापूर्वी व्यक्त केला होता..