महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार सुरुच आहे. कोरोना वाढता प्रादुर्भावा रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन करावा असा सल्ला हायकोर्टाने ठाकरे सरकारला दिला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आहे अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करावा असा सल्ला हायकोर्टाने दिला आहे. राज्यातील इतर ठिकाणी कडक निर्बंध प्रभावी ठरत आहेत ते पुण्यातही ठरतील त्यामुळे पुण्यात काही दिवसांचा का होईना पण लॉकडाऊ करावा असे हायकोर्टाने सांगितले.
मुंबईसारखे कडक निर्बंध का नाही?
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे. त्याचप्रमाणे मुंबई कोरोना रुग्णसंख्या ज्या प्रकारे कमी होत आहे याचे सर्वोच्च न्यायलयाने कौतुक केले. मुंबईत ज्या प्रकारे कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. इतर जिल्ह्यांच्या महानगरपालिका मुंबईचा आदर्श का घेत नाहीत. मुंबईत लावलेल्या कडक निर्बंधांमुळे जर मुंबईतील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे, तर पुणे व इतर इतर मोठ्या जिल्ह्यातही मुंबईसारखे कडक निर्बंध लावून रुग्णसंख्या कमी करता येईल. त्यामुळे ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा गांभीर्यांने विचार करावा असा सल्ला हायकोर्टाने दिला आहे
Post Views: 56