(रत्नागिरी)
खंडाळा येथील इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये सम्राट फाऊंडेशन व क्रिएटिव्ह टिचर्स ग्रुपच्यावतीने माजी समाजकल्याण सभापती सौ.ऋतुजा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहोळा नुकताच पार पडला. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत उठावदार कामाची चुणूक सौ.जाधव यांनी दाखवली आहे. मिळालेल्या संधीचे शब्दशः सोनं करण्याची किमया त्यांनी केली आहे. अनेक संस्मरणीय कामे गेल्या पाच वर्षात त्यांनी मार्गी लावली. त्यांना श्री राजेश जाधव यांचा सतत सक्रीय सहभाग मिळाला. शिवाय एक विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवल्याचे सर्वच प्रमुख उपस्थित मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.
यावेळी इयता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. आगरनरळ विद्यालयातील अनुक्रमे विरेंद्र गोताड, विघ्नेश महाकाळ, शितल कुलये, वरवडे विद्यालयातील मुक्ता खानविलकर, कोमल बलेकर, प्रणव घाणेकर, मॉडेल सैतवडे येथील अमृता डाफळे, अदिती झर्वे, निकीता अवेरे, न्यु इरा इंग्लिश स्कुल सैतवडे येथील सलमा दाभोळकर, आरसीया बारगीर, अंन्सारा चिकटे, न्यु इंग्लिश स्कुल सैतवडे येथील सानिया खापले, अजिंक्य शिगवण, ऋतुजा पालशेतकर, रूणाली शिगवण, जयगड विद्यालय येथील निहार बापट, तैसिन पांजरी, शितल बेंद्रे, वरवडे विद्यालयातील अभिजित कांबळे, समृद्धी भोजे, अथर्व नांदिवडेकरयांचा गौरव करण्यात आला.
उच्य माध्यमिक विभागातील जयगड ज्युनिअर कॉलेज मधील सोनाली चव्हाण, श्रावणी खेडेकर, प्रथमेश रहाटे, कला विभागातील राजश्री मयेकर, दिवाकर जोशी, सलोनी बोले तसेच श्रीमती पा.शं.बापट भागशाळा खंडाळा मधील वाणीज्य विभागातील प्रणव धनावडे, पुनम वाळके, पुजा कुर्टे, विज्ञान विभागातील पल्लवी रामाणे, शर्मिन सांगरे,अनिकेत पाष्टे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ.ऋतुजा जाधव यांनीही सर्वांचे आभार मानले. सर्व घटकांनी सर्वोत्तम सहकार्य केले तसेच ना.उदय सामंत यांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून काम केल्याचे नमूद केले. श्री राजेश जाधव यांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले. या प्रसंगी वाटदच्या सरपंच सौ.विभुते, जयगडच्या फरजाना डांगे, रिळचे श्री वैद्य, डॉ.मयुरेश मोहिते, डॉ.अस्मिता पाटील, सौ.संजना माने, मुख्याध्यापक मुठाळ, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, बापु घोसाळकर, बाबय कल्याणकर, नितीन जाधव, सुवेश चव्हाण, संदीप शितप, सुभाष पाल्ये, श्री.जाधव, तुकाराम वासावे, सौ.स्नेहा पालये प्राचार्या चाफे कॉलेज, बाबय कल्याणकर विभाग प्रमुख, अंजली विभुते सरपंच, पायल जाधव, दिपाली गमरे,रोहिणी गमरे, संध्या शितप, गीतांजली जाधव, अक्षता जाधव, संज्योत चव्हाण, सागर कदम सरपंच, साजिद शेकासन, आशिष वासावे मुख्याध्यापक, संतोष जाधव, नितीन सुर्वे, अनिकेत जाधव ,संदीप जाधव, सुयोग शितप, स्नेहल जाधव, वनिता जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने भाई जाधव, केंद्रप्रमुख श्री पवार, विलासराव कोळेकर, बाळशेठ जोग, श्री विष्णूदत्त निमकर, माजी पंचायत समिती सभापती सौ.संजना माने व सौ.मेघना पाष्टे आदींनी सौ.ऋतुजा जाधव यांना वाढदिवसासानिमित शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी परिसरातील बहुसंख्येने शिक्षक, विद्यार्थी, पालक,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अत्यंत बहारदार सुत्रसंचालन संजय बैकर यांनी केले. तर श्री राजेश जाधव यांनी यापुढे ही सम्राट फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले व सर्वांचे आभार मानले.