(रत्नागिरी)
भूतकाळात काही घटना समुद्रात अशा घडल्या आहेत की, आम्हाला त्यामुळे समुद्र जरा जरी खळवळलेला असेल तरी मासेमारीसाठी जाताना मनात शंका असायची. परंतु २०२० वर्षी आम्ही रिलायन्स फाउंडेशनच्या सागरी हवामानाच्या सेवेशी जोडलो गेलो आणि आमच्या मनातील शंका कमी होत गेली, असे मत मच्छिमार संतोष कामरे यांनी व्यक्त केले आहे. रिलायन्स फाउंडेशन व्हाट्सअप व ध्वनी संदेशांचा मार्फत आम्हाला एक दिवस आधी सागरी हवामानाची माहिती, वादळाची माहिती देत आहेत. या माहितीमुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी समुद्रात जायचं की नाही याच निर्णय घेत येतो.
संतोष कामरे हे अंजनवेल, गुहागर तालुका या किनारपट्टीवरील गावातील क्रियाशील मच्छिमार आहेत. गेली 40 वर्ष ते गिल नेट बोटीच्या सहयाने मासेमारी करत आहेत. घरामध्ये एकूण 7 व्यक्ति आहेत व संपूर्ण घरचा आर्थिक सांभाळ हे स्वतः एकटे करतात.
संतोष कामारे पुढे सांगतात, गेली ३ वर्ष आम्हाला समुद्रात जाताना धोका जाणवत नाही कारण आमच्या हातात अचूक माहिती रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळत असते. यापूर्वी अशी माहिती आम्हाला फक्त टीव्ही च्या माध्यमातून मिळत होती. परंतु प्रत्येक मासेमारांच्या मोबाईलवर ही माहिती मिळत आहे. यामुळे योग्य माहिती, योग्य व्यक्तिपर्यंत मिळेपर्यंतचा कालावधी हा कमी झाला आहे व यामुळे आम्हाला आमच्या जीवाच स्वरक्षण करता येते.
संतोष कामारे सांगतात – आमच्या जीवाचे रक्षण या माहितीच्या आधारे होताच आहे म्हणजे आमचे सामाजिक रक्षण होत आहे, परंतु या सेवेचा आम्हाला आमच्या मच्छीमारी व्यवसायासाठी होणारा खर्च वाचविण्यासाठी देखील होत आहे. आमच्या एका मच्छीमारी फेरीसाठी साधारणतः 20 लीटर डिझेल लागते व 4 माणसे बोटीवर असतात. साधारणतः 2000 रुपये डिसेल खर्च व 4 कामगारांचे 1600 रुपये (400 रुपये प्रत्येकी ) असा खर्च होतो. म्हणजे एक फेरीसाठी साधारणतः 3600 रुपये खर्च येतो. आम्ही एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 या सात महिन्यामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या सागरी हवामानाच्या माहितीनुसार वारा जास्त आहे म्हणून 5 वेळेस समुद्रामध्ये गेलो नाही. यामुळे आमचे 18000 रुपयांची बचत झाली.
आम्हाला कधी असा विचार आला नाही की आपल्या व्यवसायाची हवामानाची माहिती फोनद्वारे घरबसल्या मिळेल व रिलायन्स फाउंडेशन ही संस्था आम्हाला ही माहिती देण्यासाठी पुढाकार घेईल. परंतु या महितीचा 3 वर्षाच्या अनुभवावरून आम्हाला समुद्रात जाताना भीती वाटत नाही, हेच या रिलायन्स फाउंडेशनच्या सेवेचे मोठे यश आहे.