(ठाणे / उदय दणदणे)
“कष्ट हाच परमेश्वर”, परिश्रमाशिवाय फळ नाही, असे जनमानसात सातत्याने समुपदेशन करत सात्विक मार्गाने हजारो अनुयायांना व्यसनमुक्त व अंधश्रद्धा निर्मूलनपर प्रबोधन करून हजारो कुटुंबीयांना सुखी समृद्धीचे मार्ग दाखवणारे प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांचा व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन पर राष्ट्रीय प्रबोधन मेळावा रविवार दि.०९एप्रिल २०२३ रोजी शा. कु.पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय (नेहरूनगर) कुर्ला (पू) मुबंई -२४ येथे विविध मान्यवर व बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून तसेच राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तद्नंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत होऊन, प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा मंडळ आयोजित आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली. कॅन्सर पेशंट असोसिएशनचे डायरेक्ट डॉ.निता मोरे असिस्टंट डॉ.मिनल परब यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १४० भाविकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.त्यात कर्करोग पूर्वतापसणी, पुरुषांसाठी PR (पी आर) चेकअप अशा विविध तपासणी मोफत करण्यात आली. एकदिवसीय या भक्तिमय कार्यक्रमाने शाळेचे वातावरण अगदी प्रसन्नित झाले होते. “प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज” यांचे आणि उपस्थितीत मान्यवरांचे सत्कार मुबई मंडळाच्या वतीने करण्यात आले.
उपस्थित भक्तगणांना सात्विक मार्गदर्शन तसेच संबोधित करताना “प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज” यांनी सांगितले की वयाच्या १२ व्या वर्षांपासून माझे कार्य चालू असून आजवर लाखो भाविकांना व्यसन मुक्त करण्यात यश आले आहे. वडीलधारी माणसांचा आपल्या गुरूवर्यांचा कधीही अवमान करू नका, जो मनुष्य मानवासाठी झटतो तोच या जगात खरा देव असतो, मानवाचे जीवन क्षणभंगुर आहे ते आनंदाने जगता आलं पाहिजे,असे प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांनी संबोधित केले. त्याचबरोबर आजची तरूण पिढी प्रेमात भरकटत चालली आहे ही मोठी खेदाची बाब आहे.
“भारताची प्रतिज्ञा आत्मसात करून ती आचरणात आणली पाहिजे”
आपले जन्मदाते आईवडील हेच आपले दैवत असून खरे प्रेम त्यांच्यावर करता आले पाहिजे, “समाजात स्त्रीला मानाने जपलं पाहिजे” , “कष्ट हाच परमेश्वर” शरीर हे मंदिर आहे म्हणूनच सर्वांनी बदलत्या काळानुसार आरोग्य विषयी काळजी घेणे फार गरजेचे आहे. जीवनात बचत मार्ग स्वीकारून स्वाभिमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा, झाडे लावा झाडे जगवा निसर्गावर प्रेम करा, “भारताची प्रतिज्ञा आत्मसात करून ती आचरणात आणली पाहिजे”, असे मौलिक मार्गदर्शन प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांनी उपस्थित जनसमुदायला केलं, सदर मेळाव्याला सत्येंद्र सामंत, सदर ठिकाणच्या शाळेचे मुख्याध्यापक महादेव यादव, श्री सोनावे असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता प.पू.सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज यांच दर्शन कार्य लीलया आरतीने करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश वाहक राजेंद्र जाधव यांनी केले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी प.पू. सद्गुरूस्वामी बाळ सत्यधारी महाराज मंडळ मुंबईचे अध्यक्ष विलास घाणेकर, उपाध्यक्ष-सुभाष बांबरकर, सचिव-विनय पवार, संदेश वाहक-राजेंद्र जाधव व सहकारी समस्त कार्यकारणीने विशेष मेहनत घेतली.