(खेड)
70 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संभाव्य संघामध्ये समरीन बुरोंडकरची निवड झाली आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने पंजाब कबड्डी असोसिएशनच्या वतीने 10 ते 13 डिसेंबर 2023 च्या दरम्यान लेम्ब्रीन टॅक्स स्किल युनिव्हर्सिटी रुपनगर पंजाब येथे 70 वी राष्ट्रीय वरिष्ठ महिला गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिलांचा संघ सहभागी होणार आहे.
या स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाचे सराव शिबिर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने टी डी आर एफ वसाहत एलआयसी कार्यालयासमोर हजुरी ठाणे पश्चिम या ठिकाणी 30/11/2023 ते 8/12/ 2023 या दरम्यान होणार आहे. या सराव शिबिरामध्ये रत्नागिरीची आघाडीची खेळाडू समरीन बुरोंडकर निवड झालेली आहे. या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री सचिन कदम, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त सचिव श्री रवींद्र देसाई, उपाध्यक्ष श्री सतीश उर्फ पप्पू चिकणे व प्रो कबड्डी पंच श्री विलास बेंद्रे, राष्ट्रीय कबड्डी राजगुरू श्री सुजित फागे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रोहिणी बैकर, वैष्णवी जाधव, शुभम बिरजे, सचिन चव्हाण यांनी समरीन बुरोंडकर हिचे अभिनंदन करून सदर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.