साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वाढत्या रुग्ण संख्येमुळे साखरपा येथे कोरोना आयसोलेशन केंद्र सभापती जया माने यांच्या मागणीनुसार लवकरच सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांनी यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच हे केंद्र सुरू होणार आहे.
विशेष बाब म्हणजे या केंद्राला सभापती माने यांनी स्थानिक डॉक्टर ना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या केंद्राच्या ठिकाणी विना मोबदला काम करणार आहेत. त्यामुळे त्यांचे आभार मानले आहेत. या केंद्राच्या ठिकाणी सुमारे ४० ते ५० बेडचे केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक रुग्णांची जी धावपळ आणि गैरसोय व्हायची ती कमी होण्यास मदत होणार आहे.*
मंगळवारी सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे सभापती जया माने यांनी मेडिकल ऑफिसर डाॅ.पी.बी. अदाते यांच्या समवेत मीटिंग केली त्यावेळी खाजगी डाॅ. विद्याधर केतकर, डाॅ.गजानन केतकर,डाॅ.उदय पोंक्षे,डाॅ देशपांडे मॅडम डाॅ. आंबेकर मॅडम ,डाॅ.भोसले मॅडम, डाॅ श्री.चौगले यांच्या उपस्थितीत आयसोलेशन सेंटर सुरू करण्याबाबत बाबत सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये सर्व वैदकिय बाबींची चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व डॉक्टर्सनी सुध्धा सभापती माने यांच्या आव्हानाला उत्तम प्रतिसाद दिला.*
हे आयसोलेशन केंद्र सुरू झाल्याने जी स्थानिक नागरिकांची धावपळ व्हायची, कोरोना टेस्ट पॉझिटिव आल्यानंतर पेशंट देवरूख येथे हलवावा लागत असे त्यामुळे ती फरफट कमी होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.