(मुंबई)
इंडिया आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. देशभरातील भाजपा विरोधी 28 पक्षांच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. असं असताना केंद्र सरकारने अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं असल्याने ही लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत असल्याची राजकीय चर्चा आहे.
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचं हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे देशात सर्व निवडणुका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ याबाबतचं विधेयक मांडू शकतं. संसदेच्या दोन्ही सभा त्यामुळे या विशेष अधिवेशनाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
यादरम्यान पाच बैठका होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘X’ या सोशल मीडिया साइटवर ही माहिती दिली.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विशेष अधिवेशनाबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाआधीच हे पाच दिवसांचं स्पेशल अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.ऐन गणेशोत्सवाच्या काळात हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यावेळी एक देश एक निवडणूक विधेयक मांडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात 6 विधेयक मांडली जाणार आहेत. तसेच सात ते आठ बैठका होणार आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक याबाबतची चर्चा समोर आली होती. त्यानंतर वारंवार याबाबत चर्चा होत राहिल्या. एक देश एक निवडणूकसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे याचबाबतचा अध्यादेश सरकार आणण्याची दाट शक्यता आहे.
केंद्र सरकारने बोलावलेल्या या अधिवेशनावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रियी आली आहे. ऐन गणेशोत्सवच्या काळात हे अधिवेशन बोलावणं ही दुर्देवाची बाब आहे. तसेच यामुळे हिंदुच्या भावना दुखावणार आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद केजरीवाल आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.
Post Views: 2,458