(रत्नागिरी / प्रतिनिधी)
देशात एका विशिष्ठ वर्गाकडून संविधान जाळले जाते. समाज झोपला आहे का हेच चेक करण्याचे काम चालू आहे. अशा अनेक घटना घडत असून देखील आवाज उठवला जात नाही. संविधान हे देशाचा श्वास आहे, असे प्रतिपादन कवी नितीन चंदनशिवे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा व बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त (२६ नोव्हे.) सावरकर नाट्यगृह येथे संविधान गौरव दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापीठावर प्रकाश पवार, व्ही. बी. मोहिते, तुषार जाधव, नरेंद्र आयरे, भगवान जाधव, तु. गो. सावंत असे दोन्ही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नरेंद्र आयरे, सुहास कांबळे, तु. गो. सावंत, विजय आयरे, रत्नदीप कांबळे, शिवराज जाधव, प्रीतम आयरे, विलास कांबळे, रवींद्र पवार, मंगेश सावंत, कृष्णा जाधव, दीपक जाधव, रवीकांत पवार, दिनकर कांबळे, किरण मोहितेसह सर्व गावशाखेतील पदाधिकारी आदी उपस्थित होते.