(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारी संजीवन दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने सोमवारी (दिनांक 3/4/2023 रोजी) सकाळी 11 वाजता देवरुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव उपस्थित होतें. शिबिरात दिंव्यांगाच्या विविध प्रकारच्या सोयी सुविधा, रेशनकार्ड, पेन्शन योजना, दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज, ग्रामपंचायत ते समाज कल्याण 5% निधीबाबत माहिती देण्यात आली. यासोबत दिव्यांगां बांधवांसाठी रोजगार निर्माण करण्याकरिता उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दिव्यांगाची विविध शासकिय योजनांची माहिती देखील या शिबिरात देण्यात आली.
यावेळी संजीवन दिव्यांग विकास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष राकेश कांबळे, सचिव नंदकुमार कांबळे, कोषाध्यक्ष राखी कांबळे, सदस्य प्रकाश कदम, गणपत ताम्हणकर, आकाश कांबळे आदी उपस्थित होते.