(मुंबई)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवा वाद निर्णाम झाला आहे. त्यांनी थेट शिंदेवर त्यांनी आरोप केले आहेत. तुरुंगातून गुंडांना सोडवून टास्क दिला जातोय असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केला होता. हा गौप्यस्फोट करताना राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेत गंभीर आरोप केला होता. या आरोपांनतर संजय राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ठाण्यातील पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांमुळे शिंदे यांची बदनामी झाली. संजय राऊत यांचे आरोप समाजात तेढ, वैमनस्य निर्माण करणारे आहेत. संजय राऊत यांनी खोटे पत्र दिलय असं मीनाक्षी शिंदे यांनी तक्रारीत म्हंटले आहे. संजय राऊत यांच्या विरोधात 153 अ,501,504 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे राऊत यांचा गौप्यस्फोट
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. तुरुंगातून गुंडांना सोडवून त्यांना टास्क दिला जात असल्याचा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला होता. ठाण्यातील जामीनावर सुटलेल्या राजा ठाकूरला खासदार श्रीकांत शिंदेंकडून सुपारी देण्यात आली आहे, विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सध्या निवडणुका, पक्ष फोडणं यात अडकले आहेत, त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबद्दल किती माहिती आहे हा प्रश्नच आहे. सर्व विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला होता