( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सायले गावातील गावदेऊळ हे गावापासून सुमारे 1.5 किमी अंतरावर आहे त्यामुळे या ठिकाणी लाईट आणि रस्ता या गोष्टीची प्रकर्षाने गरज होती. त्यासाठीचा गावदेवळाचा डिपीसीटी कडे लाईटचा प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबीत होता. यासाठी येथील लोकांचा सततचा पाठपुरावा चालु असुनसुद्धा गावदेऊळ लाईटचा प्रश्न सुटता सुटत नव्हता. यासाठी आमदार शेखर निकम यांच्याकडे याबाबत ग्रामस्थांनी निवेदन दिले असता त्याचा ग्रामस्थांच्या माध्यमातून प्राधान्याने पाठपुरावा करुन तो प्रश्न आमदार शेखर निकम यांनी सोडवला तसेच गावदेवळाचा रस्ता सुद्धा होणे गरजेचे होते तोसुद्धा आमदार स्थानिक निधितून मंजूर केला. त्याचे आज भूमिपुजन व डीपी चे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
आमदार शेखर निकम म्हणाले की, प्रत्येकाने गावातील विकास कामे करताना सर्वांनी हेवेदावे विसरुन एकत्र येऊन विकास करणेचे दृष्टीने प्रयत्न करावा. उगाचच वैयक्तिक वाद व राजकारण न करता कामे करावीत. राजकारण हे एका दिवसापुरतेच आहे हे गृहीत धरुन सर्वानी गाव विकास व गाव समृद्ध करण्याचा मानस बाळगावा.
सायले गावातील या ही पुढील उर्वरित विकास कामे माझ्या माध्यमातून तसेच इतरांच्या सहकार्यातून पुर्ण करण्यासाठी आपणा ग्रामस्थांसोबत मी कठीबद्ध असेन. यामध्ये काही कामे मार्गी लागणार आहेत त्यामध्ये 1) गडगडी नदी धरणामधुन पाईप कॅनॉल ने पाणी पुरवठा करणे रु. 20.00 कोटी, 2) सोनवडे फाटा ते वाशी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पस्तावित आहे यांना काही दिवसात मंजूरी मिळेल तसेच ओझरे सोनवडे ते-ये कंळबस्ते रस्ता बजेट मधुन मंजूर असून त्याची निवीदा पुर्ण झाली असून हे काम लवकरच चालू होईल अशी माहीती आमदार शेखर निकम यांनी दिली.
आमदार शेखर निकम यांनी गावांबाबत बोलताना सांगितले सायले गाव आणि माझे ऋणानुबंध फार जुने आहेत. सायले गाव महाराष्ट्राला परिचीत असे गाव आहे. काही वर्षापूर्वी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचे सोबत सायले गावची आदर्श शाळा पहाण्यासाठी येथे आलो होतो. नावलौकीक संस्थेतील लोक या सायले गावात येऊन गेले व सायले गाव शाळेचा आदर्श घेऊन त्याच्या पुढच्या वर्षी स्पर्धेत उतरुन काटेवाडी ला आदर्श शाळा पुरस्कार मिळवला. असे हे सायले आदर्शवत गाव आहे.
सायले गावाचा सार्वत्रिक विकास करताना मंदिराचा क वर्ग पर्यटन मध्ये समाविष्ठ करणेबाबत प्रयत्न केले जातील तसेच कॅनलद्वारे प्रकल्प राबवून मुबलक पाण्याच्या माध्यमातून शेतीपुरक व्यावसायाची निर्मिती करुन तरुण वर्गासाठी रोजगार निर्मिती कशी करता येईल याचा विचार केला जाईल व गावातील तरुन वर्ग आपल्या गावातच राहून प्रगत कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल व यातूनच आपला गावाचा विकास साधता येईल.
या कार्यक्रमाच्या वेळी तरूण मुलांची उपस्थिती लक्षात घेता प्रत्येक मुलांनी मोबाईलचा वापर करताना त्यांचा शैक्षणिक दृष्टीने कसा उपयोग होईल व आपण उच्च शिक्षित कसे होवू याचा विचार करावा, विविध खेळात भाग घेऊन खेळातून आपल करिअर करावं व आई-वडीलांचे नाव उंचाऊन स्वत:च भविष्य उज्ज्वल करावं असा संदेश तसेच व्यायामशाळा, वाचनालय या ॲक्टीविटी राबवून याच्या माध्यमातून भौतिक क्षमता कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करु असा शब्द आमदार शेखर निकम यांनी तरुण वर्गाला दिला.
आमदार निकम यांनी सायले गाव विकास कामांबाबत दिलेला शब्द पुर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे आभार मानले.
यावेळी गाव मंदिर गावकर शिगवण, माईन, पांचाळ, नाचरे, गुरव, सरपंच शिला कदम, कार्यकारी अभियंता जाधव साहेब, उप अभियंता तांबे साहेब, ताटके साहेब, घारे साहेब, दिपक कदम, विजय पांचाळ, संकेत खामकर, महेंद्र नादळजकर, अनंत धनावडे, सुधीर पांचाळ, सुभाष कानाळ, भास्कर माईन, विकास बेटकर संजय घोगळे, शैलेश लहाणे, अल्का शिगवण, घोडवली सरपंच बने, सुवर्णा कोटकर व ग्रामस्थ उपस्थित होते.