( संगमेश्वर )
संगमेश्वर ते कोल्हापूर या राज्यमार्गावर संगमेश्वर ते साखरपा रस्त्याच्या बाजूलाच एन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विनापरवाना बीएसएनएलचे लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे
संगमेश्वर ते साखरपा या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तसेच साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण करण्यात आलेले आहे. याच मार्गावर रस्त्याच्या बाजूला बीएसएनएलचे लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आणि पावसाच्या सुरुवातीला विनापरवाना उत्खनन करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दोन दिवसापूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकारी पूजा इंगवले यांनी विनापरवाना उत्खनच काम त्वरित थांबवण्यात यावे अशी सांगितले होते. परंतु हे काम ठेकेदाराने मनमानी पद्धतीने सुरूच ठेवले आहे असे सांगितले जाते. बांधकाम अधिकाऱ्यांचे आदेश न जुमानता काम सुरू ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे
विनापरवाना काम
संगमेश्वर साखरपा मार्गावर संगमेश्वर येथे सुरू असलेले बीएसएनएलचे काम हे विनापरवाना सुरू असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकारी पूजा इंगवले यांनी सांगितले. मात्र जिओ ने कामासाठी परवानगी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले
फोटो – शिवणे येथे रस्त्याच्या बाजूला उत्खनन करत सुरू असलेले विनापरवाना काम