(संगमेश्वर)
जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत असणारे नायब तहसीलदार श्री. दीपक कुळ्ये आणि श्री विलास साळवी यां दोन अधिकाऱ्यांचा संगमेश्वर विभागातील उत्कृष्ट अधिकारी म्हणून छावा संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वहाब दळवी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच प्रांत कार्यालय येथे कार्यरत असणारे तहसीलदार देवदास खेडेकर व महसूल सहाय्यक गणेश खेडेकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. हा सत्कार सहसंपादक श्री सुरेशभाऊ साळवी (साप्ताहिक पोलीस तपास वार्तापत्र) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व छावा संघटनेचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री दिनेश अंब्रे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.