(संगमेश्वर / वार्ताहर)
तीन वर्षांपासून पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही निर्णय होत नसल्याने 26 जानेवारी 2023 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर ग्रुप, तर्फे नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रेल्वे स्थानकात रोज थांबा मिळावा, यासाठी संगमेश्वरवासीयांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
पत्रकार संदेश जिमन यांनी म्हटले आहे, कोकण रेल्वे प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने संगमेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात आमरण उपोषण करण्यात येईल.