(संगमेश्वर)
संगमेश्वर येथील लिटील स्टार प्री स्कुलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉमपिटीश स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शंकर नागरगोजे तसेंच पोलीस प्रतिनिधी रविंदकुमार, संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अजिंक्यराज सुर्वे, जेष्ठ पत्रकार वहाब दळवी, सौं सिद्धी पाथरे, संस्थेचे अध्यक्ष श्री धनाजी भांगे, मुख्याध्यापिका सौं राजश्री भांगे, शिक्षिका अकसा मुल्ला. मदतनीस अंजली रहाटे, तसेच सर्व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी विविध वेशभूषा परिधान करुन आलेले विध्यार्थी व विध्यार्थीनी यांनी मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये डॉक्टर, पोलीस, शेतकरी, सुतार, शिक्षक, वैमाणिक, सामाजिक सतरावरील विविध सहायक असणारे आकर्षित अशा वेशभूषा परिधान केले होत्या. याविषयी दोन शब्द मनोगतही त्यांनी व्यक्त केले. या नंतर पालक व विद्यार्थी यांनी विविध शैक्षणिक साहित्य तयार केले. यात विविध कलागुणांनी आपले कौशल्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे त्यातील नंबर काढण्यात आले.
प्रथम क्रमांक नंबर सौं स्मिता खेडेकर, २ रा नंबर सौं सेजल नारकर तर ३ रा नंबर स्वरा सुर्वे पटकावला. यानंतर मान्यवरांचे मनोगते झाली, यात पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी उपस्थित पालकांना आपल्या पाल्याच्या वेशभूशेबद्दल विद्यार्थी काय बनला पाहिजे या विषयी जाणीव निर्माण होईल याबाबत माहिती दिली, तर वहाब दळवी यांनी उपस्थित पालकांना सध्याच्या युगाची जाणीव निर्माण करुन दिली. पालक व विध्यार्थी यांच खूप जवळच नातं आहे. यात पालकांनी विशेष लक्ष देऊन पाल्यांची उत्तमरित्या प्रगती करुन घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या पाथरे काकी यांनी आपल्या पाल्याना वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. विविध गोष्टीची कवितेची पुस्तके संग्रहीत असावीत व विद्यार्थी भविष्यात लेखक व्हावेत असे संबोधित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकसा मॅडम यांनी व आभार प्रदर्शन सौं राजश्री भांगे मॅडम यांनी केले.