(संगमेश्वर/प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर पोलिसांच्या हाताला राखी बांधून अनोखा उपक्रम रक्षाबंधन निमित्ताने साजरा केला आहे. या कार्यक्रमामुळे संगमेश्वर पोलीस ठाणे येथे भावनिक वातावरण निर्माण झालं होतं.
महाराष्ट्र पोलीस हे आपल्या जनतेच्या सेवेसाठी डोळ्यात तेल घालून संरक्षणासाठी तयार असतात. आपण गुण्यागोविंदाने ज्यावेळेस सण साजरी करतो, त्यावेळेस हे आपल्या रक्षणासाठी उभे असतात. या प्रशासनातील घटकाला कोणताही सण कोणताही कार्यक्रम साजरा करता येत नाही. त्यामुळे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बु. च्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम करून वेगळा आनंद लुटला आहे. संगमेश्वर पोलिस स्थानकामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला असता त्यावेळेस सगळ्या पोलिसांचे मन भरून आल्याचे चित्र निर्माण झाले होते. या कार्यक्रमानिमित्त पोलिसांना ही वेगळा आनंदही घेतला.
या कार्यक्रमासाठी संगमेश्वर पोलीस निरीक्षक उदय झावरे, सचिन कामेरकर, भाऊ मोहिते, किशोर जोयशी, ASI भुरसाळे मॅडम, हवालदार बापट,पो लीस नाईक बरगाळे, संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, संस्थेचे संचालक जमूरत अलजी, तैमूर अलजी, सलाउद्दीन बोट, संदेश निगावले, दिनेश निगावले, धनाजी भांगे अनिरुद्ध कांबळे, जुनेद खान, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझीमा बांगी, सिमरन मालदार, सुजेन अलजी, नगमा अलजी, सारा फकीर, फातिमा खान आदी उपस्थित होते.