( मकरंद सुर्वे / संगमेश्वर )
रत्नागिरी जिल्ह्यातील, तुरळ गावचे सुपुत्र श्री. सुनील नारायण गुरव यांची “आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या” मुंबई शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सुनील गुरव हे सध्या मुंबईत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
ही संस्था 26 राज्य व भारतासह इतर 18 देशात यशस्वीपणे कार्य करते. त्याशिवाय महिला सक्षमीकरण, वृद्धाश्रम मदत, रक्तदान शिबीर व्यसनमुक्ती, गोशाळा, बेरोजगारांसाठी लघुउद्योग अशी देशसेवेची, कार्य करत आहे. या संस्थेला भारत सरकार नीती आयोगाने प्रमाणित केले आहे.
सुनील नारायण गुरव (सर) यांनी आत्तापर्यंत शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. शिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ते विशेष कार्य करतात, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कार्यशाळेत मोलाचे मार्गदर्शन करतात, अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून समुपदेशन करतात. त्यांना सलग दोन वर्षे विभाग निरीक्षक यांच्याकडून आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे श्री सुनील गुरव सर यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबे यांनी त्यांची नेमणूक मुंबई शहर अध्यक्षपदी केली. श्री सुनील गुरव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.