(संगमेश्वर)
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी संगमेश्वर येथे यशस्वी सापळा रचत कारवाई केली आहे. यामध्ये प्रशांत प्रदिप शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली.ता. संगमेश्वर आणि सचिन रमेश पाटोळे, उपसरपंच, ग्रामपंचायत राजीवली या दोघांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आले आहे.
यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे मित्राचे वतीने सदर ग्रामपंचायतचे अखत्यारीतील पाखाडी तयार करणेचे काम त्यांनी केले होते. तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व चालू पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून इतर लोकसेवक प्रशांत शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली व इतर लोकसेवक सचिन पाटोळे, उपसरपंच ग्रामपंचायत राजीवली, तालुका संगमेश्वर यांनी तक्रारदार यांचेकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कमेपैकी 15000/- रू. सरपंच प्रशांत शिर्के यांनी व 15000/- रू. उपसरपंच सचिन पाटोळे यांनी आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले.
सध्या लोकसेवक क्र. 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
——————————————————
रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
संपर्क –
1. *लाचलुचपत प्रतिबंधक विभाग*
*रत्नागिरी कार्यालय*-
फो.नं. – *02352-222893*
2. *श्री सुशांत चव्हाण, पो.उप.अधी*. , *लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी*
मो.नं. – *9823233044*
3. *श्री प्रविण ताटे, पो.नि., लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी*
मो.नं. – 8055034343
4. *श्री अनंत कांबळे, पो.नि., लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी*
मो.न. – 7507417072
5. *टोल फ्री – १०६४*