(सुरेश सप्रे / देवरुख)
आपल्या लाल मातीतील कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणारे आपल्या जिल्हय़ाचे सुपुत्र कै. बुवा साळवी यांचेमुळेच आज कबड्डी खेळ व्यावसायिक होत असून खेळाडू आर्थिकदृष्टय़ा सक्षम होत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी तालुका युवासेच्या पुढाकाराने या चाचणी स्पर्धा आयोजित केल्या, ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी आम. सुभाष बने यांनी केले..
संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन देवरुख यांच्या मान्यतेने…युवासेना( ठाकरे गट) संगमेश्वर तालुका आयोजित युवासेना चषक तालुकास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा २०२४चे उद्घाटन माजी आम. सुभाष बने.शिवसेना जिल्हा सह संर्पक प्रमुख राजू महाडीक. जिल्हा प्रमुख विलास चाळके. युवा नेते रोहन बने. तालुका प्रमुख बंड्या बोरकर यांचे प्रमुख उपस्थितीत सोहळा थाटात संपन्न झाला. प्रथम शिवप्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
संगमेश्वर तालुका युवासेना (ठाकरे गट) यांचेवतीने युवासेना चषक तालुकास्तरीय चाचणी कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील १२ संघानी सहभागी घेतला असून यातून तालुक्याच्या कुमार संघाची निवड करणेत येणार आहे. या स्पर्धा पंचायत समिती देवरूख समोरील मैदानात संपन्न होत आहेत. उद्घाटन सोहळ्याला युवा सेनेचे तेजस शिंदे, माजी नगरसेवक वैभव पवार, दादा शिंदे, तेजस भाटकर, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, युवानेते बापू शिंदे, तालुका समन्वयक सुर्वे आदी मान्यवरांसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते व युवासेनेचे सर्व तालुका पदाधिकारी व तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील सर्व कबड्डीप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.