(संगमेश्वर)
मानवाला संविधानाने हक्क दिलेले आहेत. परंतु मानवी हक्कांची पायमल्ली होत असून त्याला आळा घालण्याचे दृष्टीने, समाजाला आपल्या हक्कांची जाणीव व्हावी. हक्कअबाधित राहावेत हक्कांना व्यासपीठ मिळवून देणे या उद्देशाने मानवाधिकार हक्क संरक्षण असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे. मानवी हक्कांचे संरक्षणासाठी 1993 ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन केला होता. याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच तालुक्यातील समाजाचे हक्कांचे प्रबोधन करणेसाठीही असोसिएशन वेळोवेळी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सर्वांनी कोणतेही राजकीय व इतर हेवेदावे न करता मानवाधिकार हक्क जपण्याकरिता एकजुटीने काम करण्याचे ठरविले. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. श्री मनोहर गुरव – कार्याध्यक्ष, श्री शेखर जोगळे – शहराध्यक्ष, श्री हिदायनुल्ला शेख – उपशहर अध्यक्ष, सौ रश्मी सप्रे – तालुका अध्यक्ष(महिला विभाग), श्री विजय साळुंखे, श्री रमेश सप्रे, श्री हरिश्चंद्र गुरव, सौ सुहासिनी पांचाळ, श्री संजय टक्के, श्री संतोष कांबळे, श्री एकनाथ मोहिते, सौ.शुभांगी जाधव, श्री विजय आंब्रे, श्री नंदन भागवत आदी सदस्य व पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. मनोहर गुरव यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.